खर्डा प्रतिनधी/२३जून२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीची घटना दि. 19 जून 2025 रोजी सायंकाळी ७:१५ वाजता देवदैठण शिवार येथे घडली.याबाबत अधिक माहिती अशी की. फिर्यादी जामखेडहून देवदैठणकडे जात असताना त्याची मोटारसायकल चोरीला गेली खर्डा पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे सुभाष उर्फ राजा नंदकुमार खाडे रा.खाड़ेवस्थी, पांढरेवाडी ता.जामखेड या आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपीवर खर्डा आणि सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चार मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे , अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले, सहा. पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों/संदिप धामणे, पोहेकॉ/संभाजी शेंडे, पोकॉ/प्रविण थोरात, पोकों/बाळु खाडे, पोकों/धनराज बिराजदार, पोकों/शेषराव म्हस्के, पोकों/अशोक बडे यांनी कारवाई केली असून पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.
सोमवार, २३ जून, २०२५
मोटारसायकल चोरी करणारा चोरटा २४ तासांत गजाआड खर्डा पोलिसांची कामगिरी
Tags
# खर्डा पोलीस स्टेशन
About Unknown
खर्डा पोलीस स्टेशन
Labels
खर्डा पोलीस स्टेशन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा