खर्डा प्रतिनधी/२५जून२०२५
दि.२४ जून २०२५, जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीसांनी कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या एकूण ९ जनावरांची सुटका करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई जामखेड ते भूम रोडवर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की , सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांना गुप्त बातमी मिळाल्यानुसार, दि.२४ जून २०२५ रोजी सायंकाळी ८:३० वाजता जामखेडकडून भूमकडे जात असलेल्या दोन पिकअप वाहनांमध्ये कत्तलीसाठी जनावरे नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी सोनेगाव चौक येथे नाकाबंदी लावून त्या दोन वाहनांना रोखले. वाहनांमध्ये बळजबरीने भरलेल्या ९ जनावरांची सुटका करण्यात आली.
आरोपी नामे अभिजित रघुनाथ कुटे (वय २७, चालक) रा.कुटेगल्ली, रामेश्वर पोस्ट सुकटा ता.भूम जिल्हा धाराशिव आणि जयवंत रमेश बरकडे (वय २१)रा.कुसुमनगर ता.भूम जि. धाराशिव यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलीसांनी एकूण ९,६०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ च्या कलम ५(अ), ५(ब) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० च्या कलम ३ व ११ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत आणि पोलीस अंमलदार संदिप धामने, संभाजी शेंडे, शशी म्हस्के, बाळु खाडे, अशोक बडे, धनराज बिराजदार व योगेश भोगाडे यांनी पथकाने केली आहे. सदर तपास अजूनही सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. व्ही. शेंडे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा