खर्डा प्रतिनधी/21जून2025
येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालय , कनिष्ठ महाविद्यालय व आर्ट ऑफ लिविंग परिवार खर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते रविशंकर जी यांच्या प्रतिमेचे पूजन सहा. पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत ,मुख्याध्यापक मुस्तफा सय्यद व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात यांच्या हस्ते करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत म्हणाले, योगामुळे शारीरिक ,मानसिक व आत्मिक क्रिया बरोबरच बुद्धिमत्तेत वाढ होते, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढून, आत्मज्ञान व एकाग्रता वाढून अंनर्गत मन शांत होऊन चित्त एकाग्र होते. मोबाईलच्या व्यसनापासून मुलांनी दूर राहिल पाहिजे असे मार्गदर्शन केले.
सर्वेभवन्तुसुखिनःसर्वेसन्तुनिरामया ;सर्वेभद्राणिपश्न्तु माकशिचद दुख:भागभवेत् 'या प्रार्थना योग मंत्राने योगाभ्यासाची सुरवात करण्यात आली.
येथील खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाच्या प्रांगणात सुमारे १९२० विद्यार्थी पट संख्या असणाऱ्या शाळेमध्ये विविध योगासनाचे प्रकार, प्राणायाम, सूर्यनमस्कार ,मेडिटेशन, ध्यान आदी सामुदायिक कृती करून विषयाची सखोल माहिती व त्याचे महत्व देऊन सध्याच्या आधुनिक आणि दगदगीच्या काळात मानवी जीवनात शारीरिक व्यायामाचा अभाव दिसून येत आहे. यामुळेच अल्पवयातच तणाव मुक्त जीवनाचे विविध रोगांना बळी पडण्याचे प्रमाण लहान वयात सुद्धा वाढले आहे यामुळे तणाव मुक्त, निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी व्यायाम योगासनेची आवड निर्माण झाली पाहिजे तरच आपण जीवनात यशस्वी व्हाल असे आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक संतोष थोरात यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती देऊन योगाचे धडे दिले. मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमांमध्ये योग प्राणायाम ध्यान मध्ये पोलीस प्रशासन,विद्यार्थ्यांसह शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनीही विद्यार्थ्यांबरोबर योगासने, प्राणायाम, ध्यान केले.
यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुरेश सोनवणे, पर्यवेक्षक लक्ष्मण गदादे, क्रीडा शिक्षक प्रा. रावसाहेब केंद्रे, प्रा शिवशंकर ठाकरे, प्रा रामनाथ ढाकणे,प्रा तुकाराम विधाते, प्रा मुक्तेश्वर फामदे, प्रा गजानन मुकाडे प्रा कांतीलाल वसावे,प्रा.गणेश शिंदे ,प्रा रवींद्र कोरे ,प्रा बाळकृष्ण देशमुख ,प्रा विकास जाधव ,प्रा दीपक टाफरे ,प्रा बालाजी वागातकर ,प्रा.मारुती टारपे ,प्रा.महेश गजबार ,प्रा.संतोष देवगुणे ,प्रा.दत्ता ढाळे प्रा.अभिलाषा वांढरे, प्रा शारदा बोळे, प्रा प्रियाली बुडे, प्रा शारदा बोळे ,प्रा विशाखा ससाने, प्रा वर्षा बोबडे, प्रा मंगल साळवे,प्रा अलका तांबे यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे रवींद्र कुलकर्णी, मनीषा कुलकर्णी,गणेश जोगदंड, वैशाली थोरात, शिवराजे थोरात, महेश लोंढे, तुळशीदास गोपाळघरे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक यांनी परिश्रम घेऊन मोठ्या उत्साहात मेगा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा