खर्डा प्रतिनधी/१९जुन२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे गेल्या काही दिवसांपासून, एका मातंग समाजातील मुलीवर भ्याड हल्ला झाल्याचा मामला तापत आहे. या घटनेत खर्डा येथील कु. निकीता प्रकाश शिंदे, दिक्षा प्रकाश शिंदे, भारती अक्षय शिंदे यांच्यावर मनोज डाडर व कमलेश मोरे या नराधमांनी खर्डा याठिकाणी भ्याड हल्ला केला. तरीही आरोपी मनोज डाडर व कमलेश मोरे हे खुलेआम फिरत असून, मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून 326 आणि 307 कलमांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लहुजी शक्ती सेना, खर्डा शहर व जामखेड तालुका आणि सकल मातंग समाजाने केली आहे.
आरोपींना अटक न झाल्यास, खर्डा पोलीस स्टेशन समोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज डाडर आणि कमलेश मोरे हे खुलेआम फिरत असून, त्यांच्यावर कायद्याचा कोणताही धाक नसल्याचे निदर्शनात आले आहे. या घटनेनंतर मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा