जामखेड प्रतिनिधी - 27जुलै2025
जामखेड शहरात गेली आनेक वर्षापासून रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मोकाट जणावरे फिरत आहेत शहरातीच जणावरांचे मालक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या जनावरांचा वाहतुकीस आडथळा निर्माण होत असल्याने याच अनुषंगाने जामखेड नगरपरिषदेने आज सकाळपासूनच कारवाईचा बडगा उगारला आहे जवळपास पंधरा ते वीस जनावरांना ताब्यात घेतले त्या पैकी चार जनावरांचे मालक आढळून आले नसल्याने ती जनावरे साकत येथील गोशाळेत सोडण्यात आले तसेच सार्वजनिक रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरे मुख्यत गर्दीचे ठिकाणी चौक, बाजारतळ, खर्डा रोड, बीड रोड, मार्केट यार्ड या ठिकाणी कारवाई करण्यात आले आहे.
तसेच नगरपरिषदेच्या वतीने उद्या दि. २८/७/२०२५ पासून रिक्षा फिरवून अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे असे आव्हान नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे.नागरिकांनी आपली जनावरे मोकाट सोडु नये व त्यामुळे अपघात होणार नाहीत व होणाऱ्या कारवाईस टाळावी व नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी ज्ञानेश्वर मिसाळ (आरोग्य व पाणीपुरवठा विभाग प्रमुख) , प्रणित सदाफुले (आरोग्य व पाणीपुरवठा विभाग लिपिक), बाळू काळे (मुकादम) व आरोग्य कर्मचारी बाळू लांडगे, कल्याण काळे, सतिश कंगने, अण्णा लोखंडे, भास्कर लोंढे, विजय जाधव ,तानाजी घायतडक, तन्वीर सय्यद, विशाल जाधव आदी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा