जामखेड प्रतिनिधी /27जुलै2025
आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी शासकीय विश्रामगृह जामखेड येथे आझाद क्रांती सेनेची आढावा बैठक सेना प्रमुख राजेश जी घोडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आझाद क्रांती सेना कोर कमिटी चे नेते अशोकरावजी ढगे तसेच बीड जिल्हा प्रमुख नानासाहेब भिसे, आझाद क्रांती सेनेचे नेते किसन भिसे सर, सह आष्टी तालुकाप्रमुख संदीप वालेकर उपस्थित होते बैठकीमध्ये पाठी मागील झालेले कामाचा आढावा घेण्यात आला व पुढील कामाचे नियोजन करण्यात आले या बैठकी प्रसंगी सामाजिक चळवळीत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काम करणारे पोपटरावजी फुले यांची सर्वानुमते आझाद क्रांती सेना अहिल्यानगर पश्चिम जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली तसेच जामखेड तालुका प्रमुख म्हणून बाळासाहेब साठे यांची निवड करण्यात आली या निवडी दरम्यान उपस्थित ताना मार्गदर्शन करताना आझाद क्रांती सेना प्रमुख राजेश घोडे म्हणाले की आझाद क्रांती सेना या संघटनेकडे एक बॅनर किंवा बोर्ड म्हणून बघू नका. आझाद क्रांती सेना हा एक विचार आहे हा विचार या देशातील विस्थापित गावाकुसाबाहेरील व सर्व गोष्टींनी नाडलेल्या समूहाला आझाद भारतात गुलाम म्हणून मिळत असलेल्या विचारधारेला छेद देऊन सन्मान व स्वाभिमानाचा विचार पुन्हा एकदा या समूहाला आझाद बनवण्यासाठी देऊन. समता स्वातंत्र्य व बंधुत्वाचा विचार देण्यासाठी या देशात सामाजिक आर्थिक राजकीय गुलाम असणाऱ्या समूहाला आझाद बनवण्यासाठी हा एक लढा आहे आणि या लढ्याचे आज आपण भागीदार झाला आहात हा लढा व क्रांतीचा झेंडा ते वत ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी आता जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांच्या खांद्यावरती येऊन पडलेले आहे बाबासाहेबांनी दिलेला समानतेचा स्वाभिमानाचा विचार वाड्या वस्ती आणि तांड्यावरती घेऊन जाऊन समाजातील अन्यग्रस्त व मुक्याना वाचा फोडण्याचे काम आपण कराल यावरती माझा विश्वास आहे म्हणून येणाऱ्या काळातील अझाद क्रांती सेनेची लढाई ही हातामध्ये भारतीय संविधान घेऊन विषमतावादी स्थापित करण्याचा हा लढा आहे तेव्हा गाव तिथे आझाद सैनिक व आझाद क्रांती सेनेचा विचार पोहोचवण्याचं काम जिल्हा व तालुकाप्रमुख यांनी करावं असे मत याप्रसंगी मांडण्यात आले . संविधान चौक व अण्णाभाऊ साठे चौक यांना पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामगृह इथपर्यंत भव्य रॅली काढून रॅलीचे रूपांतर सभेत झाले व या सभेला राजेश घोडे यांच्यासहित अशोक रावजी ढगे नानासाहेब भिसे आष्टी तालुका प्रमुख संदीप वालेकर किसन भिसे सर केले ही बैठक यशस्वी करण्यासाठीखंडूजी मोरे आर पी आय कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर हनु पवार, जयसिंग पवार, आस्तिक डाडर,सुरज दादा सर ,अशोक वाल्हेकर, नागेश फुले ,सुभाष मोरे, सुभाष पवार, वसंत मोरे ,गुंडाराज मोरे ,नितीन काळे ,कल्याण शिरसागर,बाळासाहेब कांबळे, प्रदीप खवळे यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा