चौंडी प्रतिनधी/6 मे 2025
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे ,दि.६ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे शुभारंभाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा रस्ता २.७०० किलोमीटर लांबीचा असणार आहे व त्यासाठी राज्य शासनाने ३ कोटी ९४ लाख रुपयांची मान्यता दिली आहे. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी येथे हेलिपॅडवर आगमन झाले, जेथे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सुरेश धस, आमदार गोपीचंद पडळकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांसह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा