खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके रा.भोंजा ता.परांडा जि. धाराशिव यास नवी मुंबई येथून अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये खर्डा येथील फिर्यादी उत्तम रामभाऊ थोरात रा.खर्डा ता. जामखेड यांच्या मुलाला माणगाव तहसील कार्यालयात लिपीक पदावर नियुक्तीचा बनावटीचा विश्वास देऊन आरोपीने मोठमोठ्या अधिकार्यांच्या ओळखी असल्याचा खोटा आश्वास दिला. त्यानंतर फिर्यादीकडून आरोपीने पाच लाख रुपये घेऊन माणगाव तहसील कार्यालयातील लिपीक पदासाठी बनावट नियुक्ती आदेश तयार केले. फसवणुकीचा प्रकार समजून येताच खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा (रजि नं. 218/2023) दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहिता कलम 420, 435, 468, 436, 471, 34 अंतर्गत आरोपीविरूद्ध कारवाई सुरु होती.
गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता व त्याचा शोध घेतला जात होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्तवार्ता मार्गे माहिती मिळवून, दोन वर्षांच्या फरारीतून नवी मुंबई येथे आरोपीला ताब्यात घेतले. त्यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी खर्डा पोलिस स्टेशन आणण्यात आले आहे. तपासही सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्गे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच, खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, पोलिस हवालदार संभाजी शेंडे, पंडीत हंबर्डे, शशी म्हस्के, अशोक बडें व बाळु खाडे यांनीही सदर कार्यवाही केली आहे.
कोट
सदर प्रकार विभागातील मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात येतो व त्यानुसार लवकरच आरोपीविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा