पोलीस वारंट न्यूज नेटवर्क- ३ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ग्रामपंचायतीमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली असून
या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या सौ. सुनीता दीपक जावळे यांच्या हस्ते करण्यात आले .सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल व त्यांनी अथक परिश्रमातून देशात महीलांना शिक्षणाचा कसा अधिकार मिळवून दिला,या बद्दल ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित खर्डा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर , मदन पाटील ,सुनीता जावळे , दीपक जावळे, राजू मोरे, महालिंग कोरे, विकास शिंदे ,माजी उपसरपंच श्रीकांत लोखंडे , अशोक खटावकर , गणेश शिंदे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment