जामखेड प्रतिनधी/२जून २०२५
जामखेड तालुक्यात एका तरुणावर फायरिंग झाल्याची वादग्रस्त घटना काल दि.०१ जून २०२५ रोजी उघडकीस आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत २४ तासांच्या आतच ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न व आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०१/०६/२०२५ रोजी जामखेडमधील रा. पोकळेवस्ती, जामखेड येथील फिर्यादी आदित्य बबन पोकळे (२०) व साक्षीदार यांच्या सोबत रस्त्यावर लघवी करण्याच्या कारणावरून वाद उत्पन्न झाला. यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर लाथा-मुक्क्या केल्याचा आरोप आहे. तसेच, आरोपींनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने तीन गोळ्या उडवल्या. त्यापैकी दोन गोळ्या हुकल्या, तर एक गोळी फिर्यादीच्या मित्र कुणाल बंडू पवार याच्या पायाला लागली.
घटनेची माहिती लगेच मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना मिळाली आणि स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करण्याचा आदेश देण्यात आला. गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथक रवाना करण्यात आले. दिनांक ०२/०६/२०२५ रोजी तांत्रिक व गोपनीय विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख करून ताब्यात घेण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे 1) प्रभु रायभान भालेकर, वय 33, रा.निपाणी, छत्रपती संभाजीनगर 2) नकुल विष्णु मुळे, वय 40, रा.खेर्डा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर 3) शरद अंकुशराव शिंदे, वय 38, रा.पुसेगाव, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर 4) गणेश गोविंद आरगडे, वय 30, रा.खंडाळा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर 5) रावबहादुर श्रीधर हारकळ, वय 35, रा.सारासिध्दी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर 6) सुशील ताराचंद गांगवे, वय 30, रा.पद्मपुरा, छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपींनी वापरलेली कार आणि लायसन्स असलेले पिस्तूल, १ राऊंड व २ रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या खुलाशातून, प्रभु रायभान भालेकरच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या गटाने ही फायरिंग केल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या जामखेड पोलीस स्टेशन हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न, आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा (जीएनएस कलम १०९, ११५(२), ३५२, ३(५) सह आर्म ऍक्ट ३/२५) दाखल करण्यात आला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत गुन्ह्याची सर्व बाजूंची चौकशी सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक , प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
सोमवार, २ जून, २०२५
Home
स्थानिक गुन्हे शाखा
मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद
मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद
Tags
# स्थानिक गुन्हे शाखा
About Unknown
स्थानिक गुन्हे शाखा
Labels
स्थानिक गुन्हे शाखा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा