जामखेड प्रतिनधी/10 जून 2025
अहिल्यानगरमधील जामखेड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासात एक तरुणाने गळफास घेतानाची रील बनवली, पण त्याचा प्रकार पूर्णपणे बिघडला आणि तो दोराच्या फाशात अडकला. प्रकाश भीम बुडा नावाच्या या १७ वर्षाच्या तरुणाला सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने वेळीच वाचवले गेले, तरीही त्याची प्रकृती गंभीर आहे.
प्रकाश हा नेपाळचा रहिवासी असून, तो सध्या जामखेड येथील एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याने इंनस्टाग्रामवर रील व्हायरल करण्याच्या उद्देशाने एका झाडाच्या फांदीला ओढणी बांधली आणि स्वतःला हवेत लोंबकळत सोडलं. मात्र, ओढणीचा फास अचानक आवळला आणि त्याचा श्वास दाबला गेला. त्यामुळे तो तडफडू लागला. व्हिडिओ काढणाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला खाली उतरवलं आणि रुग्णालयात दाखल केलं.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अशी धोकादायक स्टंट करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबईसारख्या शहरात चालत्या लोकलमध्ये प्लॅटफॉर्मवर पाय घसरवत जाणे, रस्त्यांवर दुचाकीवर मांडी घालून बाईक चालवणे असे स्टंट अनेकदा पाहायला मिळतात. यामुळे अनेक तरुणांचा जीव धोक्यात आला आहे.
मंगळवार, १० जून, २०२५
Home
क्राईम बातम्या
तरुणाईच्या अंगात 'व्हायरल होण्याचं' भूत ; रीलच्या नादात गळफास घेतानाचा VIDEO बनवला; अचानक ओढणीचा फास आवळला अन्, जामखेड हादरलं, नेमकं काय घडलं?
तरुणाईच्या अंगात 'व्हायरल होण्याचं' भूत ; रीलच्या नादात गळफास घेतानाचा VIDEO बनवला; अचानक ओढणीचा फास आवळला अन्, जामखेड हादरलं, नेमकं काय घडलं?
Tags
# क्राईम बातम्या
About Unknown
क्राईम बातम्या
Labels
क्राईम बातम्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा