जामखेड प्रतिनधी/१८जुलै२०२५
जामखेडचे ग्रामदैवत असलेल्या श्री नागेश्वर नागपंचमी यात्रा शांततेत , सुरक्षतेसाठी पार पाडावी याकरिता आज दि.१८जुलै रोजी दुपारी १२.१० वाजता तहसील कार्यालय, जामखेड येथे शांतता समितीची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. यात प्रमुख प्रशासनिक अधिकारी, पोलीस अधिकारी, समाजप्रमुख आणि पत्रकार यांनी सहभाग घेतला. ही बैठक गणेश माळी तहसीलदार, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगरपरिषद प्रतिनिधी अजय साळवे आणि इतर सर्व संबंधित /प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
– सभेतील निर्णय आणि शिफारस
आनंद मेळा एक ठिकाणीच भरण्याची शिफारस केली गेली. त्याठिकाणी अग्निशामक आणि ॲम्बुलन्स सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच यात्रेत रस्ते मोकळे ठेवण्याबाबत सर्वाना सतर्कता घेण्याचे सांगण्यात आले. आनंद मेळा भरण्याच्या ठिकाणी योग्य परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले; तसेच, MECB कडून लाईटचे कनेक्शन घेणे, नर्तिका डावासाठी नगरपरिषद आणि MSEB च्या परवानग्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. डाव्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत अशीही शिफारस केली गेली.
नागपंचमी यात्रेदरम्यान स्वातंत्र पार्किंग सोयी करण्यात याव्यात, तेथे CCTV कॅमेरे लावावेत आणि स्वयंसेवक नेमावेत अशी शिफारस बैठकीत केली गेली. आनंद मेळा ठिकाणी स्वतंत्र मोबाईल टॉयलेट व पाण्याची व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला. यात्रेदरम्यान बोर्ड-कमान लावतांना परवानगी घेणे आणि रोडवर अडथळा होऊ नये, याची जागरूकता घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले. पंचमी वेळेस पाळणा दर निश्चित करावा अशी शिफारस झाली.
यात्रा संघटना व सुरक्षितता – महत्त्वाचे घटक
सुरक्षिततेसाठी यात्रेत गुन्हेगारी लोकांवर प्रतिबंध कारवाई करावी, आनंद मेळा व महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत, यात्रेदरम्यान शहरातील लाईट अखंडित सुरळीत ठेवावी अशी सूचना देण्यात आली. मेन पेठ रस्त्यावर यात्रेपूर्वी दुकाने लावू नयेत, तसेच पालखी मिरवणूक दरम्यान मास विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवावीत, अशी शिफारस करण्यात आली. कुस्ती आखाडा साठी स्वतंत्र पार्किंग व स्वयंसेवक नेमावेत अशी सुचवणी झाली.
यात्रेत स्ट्रीटलाईट व सौरऊर्जा दिव्यांची पुरेशी उभारणी करावी, पोलीस पेट्रोलिंग वाढवावी, आनंद मेळा निलाव करतांना ग्रामस्थांचा विचार घ्यावा अशी सूचना केली गेली. यात्रेदरम्यान अडचणीवर मात करण्यासाठी वेगळी समिती नेमावी, सिव्हिल ड्रेसचे पोलीस जास्तीत जास्त नेमावेत, आणि आनंद मेळा व महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस चौकी व अलार्म सिस्टम बसवावी, अशा अनेक मुद्द्यांवर सर्व संबंधितांनी विचार विनिमय केला.
ही बैठक शांतपणे व खेळीमेळीच्या वातावरणात दुपारी १.५० वाजता संपन्न झाली. यात्रेसाठी सर्वांनी आपापल्या पातळीवर तयारी करावी, अशी अपेक्षा सर्वांपुढे मांडण्यात आली. प्रशासन, पोलीस यंत्रणा, समाजप्रमुख, सर्व स्वयंसेवकांनी एकजूट राखून सुरक्षित व शांत यात्रा साजरी व्हावी, यासाठी सर्वांनी सक्रिय सहकार्य केले पाहिजे, अशी सर्वांची विनंती आहे. यावेळी जामखेडमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने मोठया संख्येने उपस्थित होते.
कोट
येत्या 29 जुलै रोजी श्री. नागेश्वर यात्रा होणार असून श्री नागेश्वर यात्रेपूर्वी जामखेडमध्ये शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा व समाजाने उच्च पातळीवर तयारी केली आहे. पालखी, आनंद मेळा, कुस्ती आखाडा, त्याबरोबर सर्वांसाठी पाहिला जाणारा रस्ता-यातायात, पाणी, स्वच्छता या सर्वांसाठी वेगवेगळ्या समित्या व उपाययोजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोजदाद घेतली आहे. प्रशासनाच्या या सर्वाकडे नजर राहील, असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा