आहिल्यानगर प्रतिनधी/१७जुलै२०२५
अहिल्यानगरमध्ये नुकतेच उपजिल्हाधिकारी व अप्पर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांचे स्वागत विशेष पद्धतीने करण्यात आले आहे.जामखेड तालुक्याचे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांच्या वतीने दादासाहेब गिते यांना वृक्ष भेट देऊन त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. हा सन्मान त्यांनी आज दि १७ जुलै २०२५ रोजी अहिल्यानगर येथे पार पडला.
अहिल्यानगरच्या प्रशासकीय कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दादासाहेब गिते यांचे स्वागत भाजपा युवा मोर्चाने केले. या निमित्ताने तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, तसेच बाळासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, हे देखील उपस्थित होते. वृक्ष भेट देऊन केलेल्या या स्वागतार्ह कार्यक्रमातून प्रशासन व राजकीय प्रतिनिधींमध्ये उत्तम सहकार्याचे नाते अभिव्यक्त झाले. यावेळी बाजीराव गोपाळघरे यांनी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे शब्दसमूहान विशेष स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
दादासाहेब गिते यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने त्या क्षेत्रात दूरदृष्टीने कार्य केले असून, त्यांचा सत्कार हा अभिमानास्पद मानला जात आहे. बाजीराव गोपाळघरे यांनी केलेल्या या विशेष स्वागतामुळे स्थानिक प्रशासन व सार्वजनिक प्रतिनिधी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले असून, युवकांमध्येही प्रशासनाबद्दल सकारात्मक भावना बाळगण्यास मदत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा