जामखेड (प्रतिनिधी):25जुलै2025
जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ पुरस्कार विजेते रणजित रावसाहेब राऊत यांचा सत्कार सोहळा फक्राबाद, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडला. अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी मा. दादासाहेब गीते यांच्या हस्ते राऊत यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती, ज्येष्ठ समाजसेवक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच माहिजळगावचे सचिव जयेश कांबळे, अध्यक्ष नवनाथ शिंदे, विभागीय निबंधक शरद जरे साहेब, सेवानिवृत्त फौजी व पोलीस निरीक्षक सोमनाथ लोंढे, फक्राबाद चे माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ राऊत, प्रा. अंगद गरड सर, प्रा. आण्णासाहेब जाधव सर, आदर्श शेतकरी बाळासाहेब शेवाळे, पोलीस पाटिल योगिनाथ जायभाय यांच्यासह फक्राबाद व पंचक्रोशीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मनोगतात मा. दादासाहेब गीते यांनी सांगितले की, “रणजित राऊत यांचं कार्य हे पर्यावरण जपणाऱ्या आणि संशोधनाला प्राधान्य देणाऱ्या नव्या पिढीचं प्रतीक आहे. त्यांचं हे कार्य राज्यातच नव्हे, तर देशाच्या विकासात मोलाचं ठरेल.”
रणजित राऊत यांनी सत्काराबद्दल आभार मानत सांगितले की, “हा गौरव माझ्यासाठी प्रेरणादायी असून, ग्रामीण भागातील जैवविविधतेचं दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्याचा माझा संकल्प अधिक बळकट झाला आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणादायी वातावरणात पार पडले. सूत्रसंचालन आणि निवेदन हनुमंत निकम व संयोजन जयेश कांबळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन फक्राबाद चे माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ राऊत यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा