जामखेड प्रतिनधी/19 जुुलै2025
आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील नान्नज गावात एका लहान मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाने शुज सेंटरच्या दुकानदाराला पोलीसांनी अटक केली आहे. आरोपी गफार निजाम शेख (वय ३४), जो या गावातीलच रहिवासी आहे, त्याने चप्पल बदलण्यासाठी दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर छेडछाड केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला. आरोपीने मुलीशी अनैतिक वर्तन करत तिचा हात धरून जवळ ओढले आणि डोळा मारला; तसेच घटनेबाबत कोणालाही बोलू नये अशी धमकी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मुलीने घरी सांगितल्यावर तिच्या वडिलांसोबत जामखेड पोलिस ठाण्यात फीर्याद नोंदवली गेली. त्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा