सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
परळी येथील महादेव गीते आणि बीड येथील अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत आहेत. दरम्यान, सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात अडकवल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे .महादेव गीते आणि अक्षय आठवले गटाने सुदर्शन घुलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण तर वाल्मीक कराड याला कानशिलात लगावली, त्यामुळे वातावरण आणखी तापले आहे.
दरम्यान, कारागृहात राडा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेत मध्यस्थी करून भांडण सोडवले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा