जामखेड प्रतिनिधी -31 मार्च2025
जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा, अरणगांव, जवळा, नान्नज, धनेगाव आणि पिंपरखेड येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख-शांतीची प्रार्थना केली.सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. सर्व मुस्लीम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाजाचे पठन केले या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती, बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली. समाजात संवाद वाढावा, प्रेम आणि सेवाभाव बळकट व्हावा, यासाठी मौलाना मुक्ती अफजल कासमी यांनी नमाज अदा करून अल्लाहकडे प्रार्थना केली .
नमाज पठणानंतर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार रोहित पवार ; तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अझर भाई काझी, राजेंद्र कोठारी ;नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार, शामीर भाई सय्यद, अमित जाधव, प्रकाश सदाफुले, प्रा. लक्ष्मण ढेपे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड . अरुण जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, भाजप शहराध्यक्ष पवन राळेभात, शेरखान पठाण ; ॲड शमा हाजी कादर ; ॲड . एजाज पठाण ; वाजीद पठाण ;गफ्फारभाई सय्यद ; मंजुरभाई सय्यद ; हाबीब मास्टर ;उमर कुरेशी ; हाजी जावेद सय्यद ; वसीम कुरेशी ;मुक्तार सय्यद ; जमीर सय्यद ; ईस्माइल सय्यद ; मंगेश आजबे, काँग्रेसचे राहुल उगले, वसीम सय्यद; आबेद खान ;जुबेर भाई शेख, शहाजी राळेभात ; प्रशांत राळेभात ; प्रदीप टापरे, संपत राळेभात ; मजहर काझी ;आकाश बाफना इम्रान कुरेशी ; डॉ. अल्ताफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
रमजान महिना संयम, भक्ती आणि परोपकाराचा संदेश देणारा मानला जातो. या निमित्ताने मुफ्ती अफजल कासमी यांनी जगातील शांततेसाठी आणि भारतातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी विशेष प्रार्थना केली. त्यांनी सर्वधर्मीयांनी परस्पर सहकार्य आणि सामंजस्याने पुढे जाण्याचे आवाहन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला .
सामाजिक, राजकीय ; पत्रकार बांधव आणि प्रशासनिक क्षेत्रातील व सर्व जाती धर्मातील नागरीकांनी मुस्लिम समाज बांधवांना अलिंगन देऊन ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या . यामुळे ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवुन आले
ईदगाह मैदान ; खर्डा चौक ; जयहिंद चौक ; मस्जिदी व दर्गा या ठिकाणी कोणाताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा