जामखेड प्रतिनधी/३१मार्च२०२५
जामखेड येथे झालेल्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दि 23 मार्च रोजी निवेदन सादर केले आहे. त्यामध्ये जैन अल्पसंख्यांक समाजासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत तसेच जैन समाजावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध निर्णय घेणे बाबत जैन समाजाच्या वडिलोपार्जित अथवा त्यांनी घेतलेल्या जमिनीवर अनेक ठिकाणी ताबा मारण्यात येत आहे यासाठी निर्णय घ्यावा असे निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना दलित गांधी म्हणाले ऑक्टोबर 2024 मध्ये जैन समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले आहे या मंडळाच्या अध्यक्ष म्हणून राज्यमंत्रीपदाचा दर्जा मला दिला असल्याने जैन समाजाचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सोडवण्यासाठी अधिकार प्राप्त झाला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र सरकारच्या जैन समाज आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले
यावेळी बोलताना गांधी म्हणाले सामाजिक सुरक्षा धार्मिक सुरक्षा व आर्थिक विकासाबरोबरच शैक्षणिक विकास हे उद्दिष्ट ठेवून महामंडळ निर्माण केले आहे महामंडळाचे जैन समाजाच्या विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात निधी निर्माण केला आहे उद्योग व्यवसायासाठी कर्ज स्वरूपात बाराशे कोटी रुपये देण्यात आले आहेत तसेच जैन साधू संतांना विहार दरम्यान बंदोबस्त देण्यात येणार आहे, जैन साधुसंतांना ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी विहारधाम बांधून देण्याची व्यवस्था होणार आहे तसेच बऱ्याच ठिकाणी उपाशी बांधण्याची व्यवस्था होणार आहे असे गांधी म्हणाले आणि संजय कोठारी यांनी दिलेल्या निवेदनाचा मी त्वरित विचार करून मागण्या मान्य करून देणार आहे
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी, भाजप जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर, ॲड. नरेश गुगळे, उद्योजक रमेश फिरोदिया,मिठूलाल नवलाखा, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा, सतीश ( बाबूशेठ) लोढा, सुदर्शन डुंगरवाल,राजेंद्र बलदोटा, रोशन चोरडिया, संतोष गांधी ,उमेश बोरा, सामाजिक कार्यकरते पोपट लोढा ,निखिल नहार ,सुरेंद्र गांधी, डॉ.आशिष भंडारी, पियुष लुंकड, मनीष लोढा ,किशोर गांधी ,शिरीष बोरा, सुरज अग्रवाल आदी उपस्थित होते
कोट
ललित गांधी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यामुळे जैन समाजाच्या प्रश्नांवर अधिकाधिक विचार करण्याचे आश्वासन दिले. महामंडळाच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा, धार्मिक सुरक्षा, आर्थिक विकास आणि शैक्षणिक विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. उद्योग व्यवसायासाठी कर्जाची तरतूद आणि जैन साधू-संतांच्या विहारासाठी आवश्यक सुविधांची व्यवस्था येथील चर्चेतील महत्त्वपूर्ण मुद्दे होते. गांधी यांनी संजय कोठारी यांच्या निवेदनाच्या मागण्यांचा त्वरित विचार करून मान्य करण्याचे संकेत दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा