अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे मत्स्यसेवा केंद्रात दि. 25 ते 27 मार्च 2025 या कालावधीत अनुसूचित जाती प्रवर्गातील मच्छिमार व मत्स्यव्यावसायिकांसाठी तीन दिवसीय कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मत्स्य व्यवसायातील कुशलता वाढविणे ही व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी व आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यात मदत करणार आहे. या माध्यमातून, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ (NFDB) व मा. आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, नाशिक विभागाद्वारे हा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये आदर्श वातावरणात प्रात्यक्षिक सत्रांद्वारे लाभार्थ्यांना मूल्यवर्धित पदार्थांची माहिती दिली गेली.
प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिक सत्रे आणि क्षेत्रभेटींचे आयोजन करून लाभार्थ्यांना थेट अनुभव मिळवून देण्यात आला.या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी यांना माशांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थांची माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी आधुनिक पद्धतीने मत्स्य संवर्धन जसे की बायोफ्लॉक प्रकल्प, पिंजरा प्रकल्प, पद्धतीने मत्स्य संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मत्स्य संवर्धन व मत्स्य उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग आणि बाजारपेठेतील संधी याबाबत तज्ञानी मार्गदर्शन केले. मत्स्य मूल्यवर्धित उत्पादने तयार करून व्यवसायिकांना अधिक नफा मिळवता येईल, तसेच ग्राहकांना नव्या प्रकारची उत्पादने उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी श्री. ना. वि. भादुले, प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, नाशिक, श्रीम. प्रणिता चांदे, स. म. वि. अ. नाशिक, श्री. अ. र. स्वामी, स.म.वि.अ. प्रादेशिक कार्यालय, नाशिक, श्रीम. प्रतीक्षा पाटेकर, प्र. स. आ. म. अहिल्यानगर, श्रीम. प्रतिभा दत्तू, स.म.वि.अ. अहिल्यानगर, श्री. शरदजी बाचकर, श्री. संजय वाटेगांवकर, सेवानिवृत्त अधिकारी व श्री. नकुल सदाफुले संस्थापक, मत्स्य सेवा केंद्र, जामखेड, जि. अहिल्यानगर हे उपस्थित होते.या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थींना मा.श्री. ना. वि.भादुले, प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, नाशिक विभाग, नाशिक यांचे हस्ते प्रशिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र वितरीत करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांनी मत्स्य व्यवसायातील कौशल्ये आत्मसात करून उज्ज्वल भविष्यासाठी अधिकाधिक संधी मिळवाव्यात, असा संदेश देण्यात आला. मत्स्य व्यवसायात कुशलता वाढल्यास रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळविण्यास मदत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा