बीड प्रतिनिधी २ ऑक्टोबर
बीड जिल्ह्य़ातील बहुचर्चित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खुन केल्याप्रकरणी आरोपी अशोक बाजीराव घाडगे यास दोषी ठरवून बीड जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके यांनी जन्मठेप, २० वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास एवढया मोठ्या स्वरूपाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत सविस्तर असे की, दि. २१/१०/२०१५ रोजी पिडीतेची आई एका कौटुंबिक कार्यक्रमानिमीत्त बाहेरगावी गेली होती. ती सायंकाळी परत आली असता पिडीता हि घरात दिसली नाही. यावरुन यातील फिर्यादीने विचारपुस केली असता पिडीता दुपारपासून दिसली नाही असे निदर्शनास आले. त्यामुळे फिर्यादीने नातेवाईकांस फोन करून विचारपुस केली व घराच्या आसपास तिचा शोध घेतला असता संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास त्याच परिसरातील शेतातील बाजरीचे पिकात पिडीता हि मयत अवस्थेत मिळुन आली.
सदर प्रकरणाची चौकशी केली असता पिडीता हि शाळेतुन आल्याचे नंतर आरोपीने घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तिला त्याच परिसरातील शेतामध्ये बाजरीचे पिकात नेवुन तिचेवर बळजबरीने बलात्कार करून मुलीने सदरची घटना कोणस सांगु नये म्हणुन तिचे कपाळावर, तोंडावर दगडाने मारून तिस गंभीर जखमी करून खुन केला असल्याचे समोर आले. ही घटना दि. २१/१०/२०१५ रोजी घडली होती.
याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अशोक बाजीराव घाडगेविरूध्द कलम ३०२, ३७६ (२), (एफ) (आय) भादवी आणि कलम ३,४,५ (एन), ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. यावरून तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक जी. एन. पठाण यांनी या प्रकरणाचा तपास केला व मा. जिल्हा व सत्र न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणाची सुनावनी जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके यांच्या समोर सुनावणी झाली सदर आरोपी विरुध्द गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षाने दाखल केलेला परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकिय पुरावा व कागदपत्रे. तसेच जिल्हा सरकारी वकिल अजय राख यांचा युक्तीवाद ग्राहय धरून जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके यांनी आरोपी अशोक बाजीराव घाडगे यास वेगवेगळ्या गुन्ह्यात दोषी धरून जन्मठेप व दोन हजार रूपये दंड ,२० वर्ष सक्तमजुरी व २ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा असा विविध शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. आरोपीस या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. सदर प्रकरणात जिल्हा सरकारी वकिल अजय राख यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment