पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२४ नोव्हेंबर
नगरसेवक ॲड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंध व दिव्यांग बांधवांना वसतिगृह ते महाविद्यालयपर्यंत उपलब्ध करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी खासदार विखे म्हणाले की, नगरसेवक धनंजय जाधव यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबवून समाजामध्ये चांगलं काम करण्याचा संदेश दिला आहे, याबद्दल मला खरोखर खूप अभिमान वाटतो. अंध व दिव्यांग मुलांना वसतिगृह पासून ते महाविद्यालयापर्यंत ये-जा करण्यासाठी मोफत स्कूल व्हॅनची सेवा सुरू केल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच. असे वेगवेगळे संकल्प ते नेहमी करत असतात. माझ्या वाढदिवसानिमित्त ही सेवा सुरू झाल्याबद्दल मला विशेष आनंद वाटत आहे. असे मत खासदार सुजय विखेंनी व्यक्त केले.
दरम्यान नगरसेवक ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, खासदार सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनाप्रेम या संस्थेतील दिव्यांग अंध बांधवांना वसतिगृह ते विद्यालयात ये-जा करण्यासाठी मोफत स्कूल व्हॅनची सेवा सुरू करून दिली असून खासदार विखेंच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतो. त्यामुळे त्यांना एक भेट म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा विशेष संकल्प केला आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी देखील सदरील सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खासदार विखे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ॲड. धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत स्कूल व्हॅन बसची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही खासदार सुजय विखे आणि धनंजय जाधव यांचे आभारी आहोत. आम्हाला कॉलेजला जातेवेळी स्टिकचा आधार घ्यावा लागतो. कधी कधी बाईक स्वार आम्हाला धक्का मारून जातात, त्यामुळे अपघात देखील होत असतात. परंतु आता स्कूल व्हॅनची सेवा उपलब्ध झाल्याने आम्हाला सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment