पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२३ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ल्यासमोर भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून बांधकामास सुरुवात झाली होती परंतु काही खर्डा ग्रामस्थांच्या विरोधानंतर सदरचे बांधकाम थांबविण्यात आले होते.
या संदर्भात विविध वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे सदरचे बांधकाम वादग्रस्त झाले होते, परंतु खर्डा ग्रामस्थ, हिंदुत्ववादी संघटना, पुरातत्व विभागाचे विजय धुमाळ , तहसीलदार योगेश चंद्रे , यांनी एकमताने पर्याय काढून या ठिकाणी होत असलेल्या जन सुविधा केंद्राचे बांधकाम खर्डा किल्ल्याच्या दर्शनी भागापासून थोडे मागील बाजूस करण्याची ठरले आहे.
या जनसुविधा केंद्राच्या बांधकामाचा प्रश्न सर्वांसमक्ष निकाली निघाल्यामुळे सदरचे बांधकाम पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खर्डा शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या भव्य इमारतीमुळे खर्डा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी ही इमारत बांधण्यात येणार आहे. या जनसुविधा केंद्र योजनेमधून एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये उपहारगृह (कॅन्टीन) व सुलभ इंटरनॅशनल संस्थेमार्फत स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. त्यामुळे खर्डा किल्ल्याच्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना ही सुविधा मिळणार आहे त्यामुळे खर्डा परिसराच्या आर्थिक उलाढालित भर पडणार असून आज खर्डा ग्रामस्थ, तहसीलदार योगेश चंदरे , व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी धुमाळ यांनी समक्ष पाहणी करून चर्चेतून मार्ग काढून सदरची इमारत किल्ल्याच्या दर्शनी भागाला अडथळा न येता मागील बाजूस बांधण्यास सर्वांबरोबर चर्चा करून परवानगी दिल्याने अखेर वादग्रस्त ठरलेले जन सुविधा केंद्राचे बांधकामाचा विषय अखेर आज मार्गी लागल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे. यावेळी उपस्थित तहसीलदार योगेश चन्द्रे, पुरातत्व विभागाचे अधिकारी विजय धुमाळ , सरपंच संजविनी पाटील ,हिंदुस्तान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडू राजे भोसले , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, राष्ट्रवादी जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर , बाजार समिती संचालक वैजिनाथ पाटील ,ग्रामपंचायत सदस्य मदन गोलेकर ,सहभागी शिवभक्त धारकरी बबलु निकम, संकेत सातपुते, रुद्रा हुंबे ,सोनाजी सुरवसे, गणेश ढगे, धीरज कसबे, शेखर सकट, योगेश सुरवसे ,प्रदीप टापरे ,ओंकार इंगळे ,घनश्याम राळेभात, भाऊ पोटफोडे, जगन्नाथ मेहेत्रे, गणेश जोशी सह बहूसंख्येने कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment