पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२४ नोव्हेंबर
लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी विळद घाटात आयोजित कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. वाढदिवसानिमित्त विळद घाट या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेक बड्या नेत्यांसह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी, जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि मित्र परिवाराने शुभेच्छांची उधळण करून त्यांचा वाढदिवस खास बनवला.
दरम्यान, काल जिल्ह्यात अनेक ठिकाणी खा. डॉ. विखेंच्या वाढदिवसानिमित्त अनोखे उपक्रम देखील राबविण्यात आले. यासह विविध समाज माध्यमांवर आणि प्रत्यक्षात भेटून देण्यात येणार्या शुभेच्छांचा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मनस्वी स्वीकार केला. तसेच जनतेकडून आणि जनतेचे प्रतिनिधित्व करणार्या लोकप्रतिनिधींकडून मिळालेल्या या प्रेमाबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
काल सकाळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. मोनिकाताई राजळे, माजी आ. शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभय आगरकर, प्रवरा साखर कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे आणि सर्व संचालक मंडळ, निखिल वारे, धनंजय जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, दक्षिण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आलेले कार्यकर्ते, खा. डॉ. विखे पाटील यांचे चाहते उपस्थित होते.
यावेळी खा.डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, आपल्या या शुभेच्छा अधिक जोमाने आणि नव्याने कार्य करण्यास मला प्रेरित करत असतात. सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला दिलेल्या शुभेच्छांनी मी अतिशय भारावून गेलो आहे. असेच थोरामोठ्यांचे आशीर्वाद, समस्त सहकार्यांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रेम व जिव्हाळ्याचे नाते सदैव टिकून राहावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
................
शंभरहून अधिक केक कापले
शुक्रवारी विळद घाटाच्या आवारात आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात कार्यकर्ते, हितचिंतक आणि स्नेही परिवार यांनी खा. विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणलेले शंभरहून अधिक केक खा.डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते कापण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या उत्साह आणि प्रेमापुढे खा. विखे पाटील देखील भारावून गेले होते.
...............
मुख्य केकेवर क्रिकेट स्टेडियमची थिम
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या मुख्य केकवर अहमदाबादच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडीयमची थिम साकारण्यात आली होती. लोणीच्या पायरन्स क्रिकेट ग्रुपच्या वतीने ही केकची देखणी थिम साकारण्यात आली होती. हा केेक सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता.
.................
उपस्थितांसाठी मिष्टान्न
वाढदिवसाचे औचित्य साधून विखे पाटील परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त विळद घाट या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येणार्या पाहुणे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, स्नेही यांच्यासाठी विविध प्रकारातील जेवणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी स्वत: खा. डॉ. विखे पाटील यांनी उपस्थितांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
........................
No comments:
Post a Comment