पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२६ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ग्रामपंचायत कार्यलयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधानाच्या प्रस्थावेनेच वाचन करून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच संजीवनी पाटील , बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील, शेतकरी संघटना अध्यक्ष सुनील लोंढे ,ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे ,महालिंग कोरे,गणेश शिंदे , महेश दिंडोरे ,राजू मोरे ,दीपक जावळे ,सुनीता जावळे , सातेफळ ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ सदाफुले, सामाजिक कार्यकर्ते भीमराव घोडेराव, मुंबई पोलीस राहुल जावळे , बाबू सकटसह ग्रामपंचायत कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भीमराव घोडेराव यांनी प्रस्ताविकमध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेले परिश्रम , व कसे झाले बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार त्यांनी यावेळी सांगितले व संविधानाच्या प्रस्तावेनेचे वाचन करून अभिवादन केले .
No comments:
Post a Comment