जामखेड (प्रतिनिधी) :/13ऑक्टोबर 2025
जामखेड येथील रेणुका कलाकेंद्रावर झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने उकलला असून, या प्रकरणात दहशत निर्माण करणारे सात आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे आणि स्कॉडा कंपनीचे वाहन असा एकूण ₹6,53,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. पथकांमध्ये पोहेकॉ सुरेश माळी, दिपक घाटकर, हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, पोना श्यामसुंदर जाधव, पोकॉ प्रकाश मांडगे, सागर ससाणे, रोहीत यमुल, भागवान थोरात, सतिष भवर, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, मपोकॉ सोनल भागवत व चा. पोहेकॉ अर्जुन बडे आदींचा समावेश होता.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षय किशोर बोरुडे (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्यातील इतर साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी पुढील सहा आरोपींना अटक केली असून, 11 आरोपी फरार आहेत.
जेरबंद आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
अक्षय किशोर बोरुडे (29, रा. तिसगाव)
शहनवाज अन्वर खान (30, रा. तिसगाव)
जयसिंग दादापाटील लोंढे (25, रा. आडगाव)
अविनाश भास्कर शिंदे (29, रा. तिसगाव)
गणेश सचिन शिंदे (19, रा. तिसगाव)
ऋषिकेश यौसेफ गरुड (18, रा. तिसगाव)
अनिकेत ऊर्फ बाळा नितिन कदम (25, रा. आष्टी, जि. बीड)
तपासादरम्यान अनिकेत कदम हा विना नंबरच्या स्कॉडा कारमध्ये गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसांसह आढळून आला.
जामखेड पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. 548/2025 हा भारतीय दंड विधानातील कलम 333, 324(4)(5), 189(2), 191(2)(3), 190 सह आर्म्स अॅक्ट 4/25 व फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम 1932 च्या कलम 7 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल व आरोपींची पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्याकडे सुपूर्दगी देण्यात आली असून, तपास सुरू आहे.
सदर कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्ष पथकाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा