पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२६ मार्च
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे तब्बल ६ कोटी रूपये खर्च करून निर्माण केलेली व पंचक्रोशीतील २० च्या वर गावांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणारी खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मागील अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या इमारतीचे उद्घाटन होऊन येथून आरोग्याच्या सुविधा कधी मिळतील असा प्रश्न या परिसरातील जनतेतून विचारला जात आहे.
माजी मंत्री व सद्याचे विधान परिषदेचे आ. प्रा. राम शिंदे हे मागील भाजपा सरकारच्या काळात मंत्री असताना त्यांनी खर्डा पंचक्रोशीतील अरोग्याची समस्या ओळखून खर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीसाठी तब्बल ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णही झाले आहे. हे काम पूर्ण होऊन साधारण ८-९ महिन्याच्या कालावधी उलटून गेला आहे. मात्र या आरोग्य केंद्राच्या उद्घाटना अभावी इथून नागरिकांनी सेवा मिळत नसल्याने हे कधी सुरू होणार असा प्रश्न खर्डा व परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे.
सद्या वाढत्या महागाईच्या काळात गोर गरीबांना खाजगी आरोग्य सुविधा घेणे परवडत नसल्याने अनेक रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयात सुविधा मिळाव्यात यासाठी गोरगरीबांचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी रूग्णालयास प्राधान्य दिले आहे. यामुळे इमारत उभी असूनही या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे लवकर या नवीन आरोग्य केंद्राचे उद्घाटन व्हावे अशी मागणी होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment