जामखेड प्रतिनिधी:२ ऑक्टोबर
प्रभाग क्रमांक १५ मध्ये बिभीषण धनवडे यांचे सामाजिक कार्या बरोबरच धार्मिक काम चांगले आहे. जगदंबा महीला मंडळ गेल्या अठरा वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करते. आता फक्त नऊ दिवसच नाही तर बारा महिने देवीची सेवा करण्यासाठीच नगरसेवक बिभीषण धनवडे यांनी देवीच्या मंदिराचे काम केले आहे असे मत आ. प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले .
प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक बिभीषण धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा महीला मंडळ आयोजित दि १ अॉक्टोबर रोजी श्री जगदंबा देवी मंदिर उभारणीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आ. प्रा राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच यावेळी त्यांनी सालाबाद प्रमाणे प्रभागातील भाविकांना मोहटा देवी दर्शनासाठी घडवण्यात आले याचा देखील शुभारंभ श्रीफळ फोडून करण्यात आला. तसेच या वेळी त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. आरती नंतर मंडळाच्या वतीने आ. प्रा राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना प्रा राम शिंदे म्हणाले की गेली अठरा वर्षापासून जगदंबा महीला मंडळ नवरात्र उत्सव साजरा करते. मी देखील भक्ती भावाने देवीच्या चरणी श्रध्दा करतोय अपल्या मनातील इच्छा पुर्ण करतो. संस्कार आणि संस्कृती महत्त्वाची आहे .भक्तीच्या मार्गातून एका पिढीतुन दुसर्या पिढीला संस्कार देण्याची गरज आहे.
माझा नवस पुर्ण झाला आता तुम्ही देखील मोहटा देवीला निघाला अहात तुमचा देखील नवस पुर्ण होवो अशी इच्छा व्यक्त करतो .मी माजी आमदार होतो त्यावेळी सरकार गेले मी आता आमदार झालो आणि पुन्हा आपले सरकार आले. लवकच सर्व नीटनाटक होईल. माझं मंत्रीपदासाठी नाव पुन्हा चर्चेत आल्या शिवाय रहाणार नाही. माझी पक्षाने दखल घेऊन मला आमदारकी दिली आहे. आता त्या संधीचे सोनं करणार आहे. आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असतो.
येणाऱ्या काळात नक्कीच सर्व विकास कामे होतील. नगरसेवक बिभीषण धनवडे यांनी तुम्हाला येथुन पुढे नऊ दिवसच नाही तर तुम्हाला बारा महिने देवीची सेवा करण्यासाठीच मंदिराचे काम सुरू केले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी जी मदत लागेल त्यासाठी करेल असे अश्वासनान देखील यावेळी आ. प्रा. राम शिंदे यांनी दिले. या वेळी जगदंबा महीला मंडळासह तालुक्यातील सर्वच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेवक बिभीषण धनवडे हे दरवर्षी महीलांसाठी हळदी कुंकू, स्वच्छता अभियान, कोजागिरी पौर्णिमा उत्सव सह सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करत आसतात .
यानंतर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मतदारसंघातील देवींचे दर्शन आरती आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी काल त्यांचा शहरासह तालुक्यात दौरा आयोजित करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment