खर्डा प्रतिनधी/10एप्रिल2025
जामखेड तालुक्यातील खर्डा गावातील जि.प.प्राथमिक शाळेने वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले. या कार्यक्रमात 120 मुलींनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. सरपंच संजीवनी पाटील, मनीषा सुरवसे आणि अन्य मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला हार, फुल, नारळ वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली. पालकांनी मोठ्या संख्येत कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले.
वार्षिक स्नेह संमेलन हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांना व्यापक मंचावर मांडण्याची संधी मिळते. पालकांसाठी हे कार्यक्रम आपल्या मुलांमधील हुनर ओळखण्यासाठी मदतनीस ठरतात. लहान मुलींनी केलेल्या कार्यक्रमांनी सर्वांचे मन जिंकले. बक्षीसांच्या वर्षावासह पालकांकडून टाळ्यांचा आवाज उमटला.शाळेचे मुख्याध्यापक गीते सर व शिक्षकवृंदाने या कार्यक्रमाच्या यशासाठी प्रचंड परिश्रम घेतले. पत्रकार व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आला
.यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्यध्यापक, सरपंच, माजी सभापती , पत्रकार, शिक्षक,शिक्षिका पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धनाथ कचरे यांनी केले तर आभार व्यक्त सुनील गोलेकर यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा