शिर्डी प्रतिनधी/१०एप्रिल२०२५
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे रामनवमीच्या वातावरणात भिक्षेकरी धरपकड मोहीमेची कारवाई राबवण्यात आली, परंतु त्यात गेल्या काही दिवसांत ५० जणांची धरपकड करून त्यापैकी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने प्रशासनाची कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हे प्रकरण अमानवीय असल्याचा आरोप करत सरकारी यंत्रणांवर ठोकशाही वागण्याचा आरोप केला आहे.
शिर्डी पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने भक्तांच्या त्रास कमी करण्यासाठी ही मोहीम राबवली होती. पाचाहून अधिक भिक्षेकरी पकडले गेले ज्यापैकी दहा जणांना आजारपणाच्या कारणावरून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील चार जणांचा मृत्यू उपचार दरम्यान झाला, तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांपैकी अशोक बोरसे, इसाक शेख, प्रवीण घोरपडे आणि सारंधर वाघमारे यांनी जीव गमावला आहे. सदर प्रकरणात रोहित पवार यांनी या घटनेची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेत रुग्णांना योग्य उपचार न दिल्याचे, पाणी देण्यात आले नाही, एकाच खोलीत बांधून ठेवल्याचे आरोप केले जात आहेत.
कोट
ही कारवाई रामनवमीच्या सणा वेळी शिर्डीतील भक्तांना होणार त्रास कमी करण्यासाठी केली गेली. मात्र, मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरुद्ध आक्रोश केला आहे. त्यांचा आरोप आहे की त्यांच्या कुटुंबीयांना भिकारी समजून गलतपणे ताब्यात घेण्यात आले आणि उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा