जामखेड प्रतिनधी/१२मार्च२०२५
पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अहिल्यानगर येथील जामखेडमधून आलेल्या दोन मित्रांनी मोशी परिसरातील एकाच झाडाला गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
तुषार अशोक ढगे (वय 25 वर्ष रा. हुंडा पिंपळगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर) आणि सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय 30) अशी मृतांची नावे आहेत. दोघांनीही मोशी येथील भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती या ठिकाणी असलेल्या एका लिंबाच्या झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, ही घटना आज सकाळी (12 एप्रिल ) पिंपरी चिंचवडमधुन उघडकीस आली आहे. मयत तुषार व सिकंदर हे दोघे मित्र असून ते जामखेड येथे चालक म्हणून काम करीत होते. शुक्रवारी (11 एप्रिल) दोघेही आपल्या मूळ गावावरून पुण्याला आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्यांनी एकसोबत आत्महत्या का केली ? याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतर अधिक माहिती समोर येईल.
कोट
सदर घटनेबाबत मात्र एकसोबत आत्महत्या का केली ? याचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने जामखेड तालुक्यात खळबळ उडाली असून ही हत्या की आत्महत्या ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित झाला असून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा