जामखेड प्रतिनधी/9एप्रिल2025
संजीवनी विद्यापीठ कोपरगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील निसर्ग अभ्यासक, वन्यजीव छायाचित्रकार, संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांना प्रतिष्ठित युवा शास्त्रज्ञ पुरस्कार रासायनिक तंत्रज्ञान संस्था, उरल फेडरल युनिव्हर्सिटी, येकातेरिनबर्ग (UrFU) रशिया येथील प्रा. एलेना कोवालेवा यांच्या हस्ते दिनांक २९ मार्च २०२५ रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
हि आंतरराष्ट्रीय परिषद संजिवनी विद्यापीठ कोपरगाव, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया, युरल फेडरल युनिव्हर्सिटी रशिया, विज्ञान भारती पश्चीम महाराष्ट्र, टारलक आग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी फिलिपाइन्स, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कंबोडिया, नॅशनल चुंग चेंग युनिव्हर्सिटी तैवान यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोपरगाव येथे दिनांक २८ ते २९ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
ही परिषद “शाश्वत जैव संवर्धन आणि जैव अर्थव्यवस्थेसाठी जैवतंत्रज्ञान संशोधनातील नवकल्पना: आव्हाने आणि पद्धती” या विषयावर केंद्रित होती. यात भारतासह विविध देशांतील नामांकित शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
रणजित राऊत यांनी आपल्या उल्लेखनीय संशोधन कार्याने विज्ञान क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे. त्यांनी ४५ शोध निबंध, ५ पेटंट, ५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांनी ३० पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेऊन आपले शोधनिबंध सादर केले आहेत. राऊत यांचे विविध विषयांवर वर्तमानपत्रात लेख प्रसिध्द झाले असून, त्यांनी विविध महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावर व्याख्याने दिली आहेत, त्यांनी ३ वेगवेगळया विषयात पदव्यूत्तर पदव्या मिळवून, वन्यजीव विज्ञान विषयात पदविका, मधुमक्षिका पालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण केला असून सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राणीशास्त्र विभागात पीएच. डी. चे संशोधक विद्यार्थी आहेत, जैवतंत्रज्ञान, जीवविज्ञान, प्राणीशास्त्र, वन्यजीवशास्त्र, जैवविविधता संरक्षण व संवर्धन
इत्यादी विविध क्षेत्रातील संशोधन योगदानामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला. राऊत यांना मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.राऊत यांच्या यशाबद्दल प्रा. डॉ. विश्वास चव्हान (वरीष्ठ शास्त्रज्ञ), प्रा. डॉ. बबन इंगोले (वरीष्ठ शास्त्रज्ञ), प्रा. डॉ. अनिल कुऱ्हे, प्रा. डॉ. जे. डी. शेख, प्रा. डॉ. राम चव्हान, प्रा. डॉ. रुपेंद्र भागडे, प्रा. डॉ. ए. एम. भोसले, प्रा. डॉ. बी. ए. पवार, प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, प्राचार्य डॉ. एस. बी. दहिकर, प्राचार्य डॉ. पी. एम. दिघे, प्राचार्य डॉ. फारुकी, प्रा. डॉ. आर. ए. पवार, प्रा. डॉ. विद्या प्रधान, प्रा. डॉ. यास्मिन शेख, प्रा. डॉ. सरीता भुतडा, प्रा. डॉ. सुनिल पोकळे, प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. डॉ. टि. एस. पठाण, प्रा. डॉ. प्रशांत हराळे, प्रा. डॉ. किशन थेटे, प्रा. डॉ. बी. जे. उगले, प्रा. डॉ. फिरोज शेख, प्रा. डॉ. मुजीब शेख, प्रा. डॉ. आत्माराम आंधळे, प्रा. डॉ. विलास जीवतोडे, प्रा. एम. एम. बरवंट, प्रा. वाय. पी. शिंदे, प्रा. योगेश उगले, यांनी ही अभिनंदन केले व त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रणजित राऊत यांना आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई चे प्राचार्य डॉ. एम. व्हि. कानेटकर, सर्व उपप्राचार्य, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख व राऊत यांचे पीएच डी. चे मार्गदर्शक प्रा. डॉ. जी. डी. सुर्यवंशी महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. रणजित राऊत यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवर, सहकारी संशोधक विद्यार्थी, मित्र व परिवाराकडून त्यांचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा