जामखेड (प्रतिनिधी) –१८ऑक्टोबर२०२५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, जामखेड तालुक्याच्या वतीने आयोजित गुणगौरव व प्रेरणादायी कार्यक्रम महावीर मंगल कार्यालय, नगर रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आमदार रोहित पवार यांचा देखील मंचाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पोलीस वारंटच्या संपादक श्वेता बापूसाहेब गायकवाड यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.आपल्या भाषणात आमदार रोहित पवार म्हणाले, “समाजातील चांगले कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान व्हावा, अशा उपक्रमांना दरवर्षी माझ्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल,” असे त्यांनी सांगून कार्यक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक नायगावचे माजी सरपंच शिवाजी भिवाजी ससाने म्हणाले की, “हा सुरुवातीचा टप्पा असून आगामी काळात सामाजिक व राजकीय अशा विविध उपक्रमांचे आयोजन मंचाच्या वतीने करण्यात येईल. यामध्ये प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळेल. तसेच दरवर्षी आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे.”या वेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, प्रकाश सदाफुले, बबनराव तुपेरे, बाळासाहेब आव्हाड, प्रा. विकी घायतडक, रावसाहेब जाधव, दिलीप मोरे, मंगेश आजबे, सागर कोल्हे, युवराज उगले, निखिल घायतडक, बापूसाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिजवान बागवान यांनी केले, तर आभार प्राचार्य विकी घायतडक यांनी मानले.कार्यक्रमाला महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा