जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न ! - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

सोमवार, २४ जुलै, २०२३

Home राजकीय बातम्या जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

सोमवार, जुलै २४, २०२३ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२४ जुलै

शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या तारांचा मुद्दा, पिंपरी चिंचवड येथील रोहित्राचा स्फोटातील मृतांच्या वारसांना मदत व मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने जामखेड मधील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू या तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे आमदार प्रा राम शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

जामखेड शहरातील जुन्या डी. जे. हॉटेलच्या पाठीमागील भागातील एका घरावरून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मे २०२३ च्या चौथ्या आठवड्यात घडली होती. या घटनेवरून आमदार प्रा राम शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. 

आमदार प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर लेखी उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे की, सदर घटना खरी असून जामखेड शहरातील मुख्य वीज वाहिनी इतरत्र हलविण्याबाबत जामखेड उप विभागात नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.मयत मुलीच्या कुटुंबियांना महावितरणातर्फे तातडीची मदत म्हणून २० हजार रूपये देण्याकरीता महावितरणचे कर्मचारी गेले असता त्यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास नकार दिला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.११ के. व्ही. वीज वाहिनीमुळे अपघात टाळण्याकरीता तातडीची उपाययोजना म्हणून सद्य:स्थितीत जामखेड शहरातील अरुंद रस्त्यालगत असलेल्या ११ के. व्ही. वीज वाहिनीकरीता कोटेड कंडक्टरची व्यवस्था करण्यात आली असून सदर काम २ ते ३ दिवसात पूर्ण करण्यात येईल. असे ऊर्जामंत्र्यांनी  म्हटले आहे. 

राज्यातील शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारा व डीपीच्या दुरुस्तीची कामे सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी करणेबाबत आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रमेशदादा पाटील, आमदार उमा खापरे,आमदार प्रविण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रसाद लाड, आमदार रामदास आंबटकर,आमदार निलय नाईक, ॲड निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वीज ग्राहकांना उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी महावितरणच्या धोरणानुसार राज्यात महावितरणच्या क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्ती आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स अंतर्गत प्रत्येक स्तरावर महावितरणच्या सुचिबध्द कंत्राटदाराकडून विद्युत तारा बदलणे, झोळ आलेल्या विद्युत तारा ओढणे, जंपर बदलणे, पोल बदलणे, झाडाच्या फांद्या तोडणे, स्टेला व्यवस्थित ताणे बसविणे, रोड क्रॉस गाळ्याला गार्डींग व्यवस्थित करणे, डीस्ट्रीब्यूशन बॉक्स दुरुस्ती करणे इ. कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी करण्यात येतात. त्यामुळे संभाव्य ब्रेकडाऊन किंवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे तसेच अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले.

पिंपरी चिंचवड (जि. पुणे) परिसरातील भोसरी, इंद्रायणी नगर भागात रोहित्राचा स्फोट होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना भरपाई मिळणेबाबतचा तारांकित प्रश्न आमदार उमा खापरे, आमदार प्रसाद लाड, आमदार रमेशदादा पाटील, आमदार रामदास आंबटकर, आमदार ॲड निरंजन डावखरे, आमदार प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित केला होता. 

यावर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की,भोसरी, इंद्रायणी नगर (पिंपरी चिंचवड, जि. पुणे) भागात रोहित्राचा स्फोट होऊन तिघे जण मृत्यूमुखी पडण्याची घटना घडली होती. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिघांच्या वारसांना, महावितरणच्या नियमानुसार प्रत्येकी रुपये ४ लाख याप्रमाणे एकूण रुपये १२,००,०००/- दिनांक १२/१०/२०२० रोजी देण्यात आले आहेत.उर्वरित रकमेबाबतची कार्यवाही प्रक्रियाधिन आहे. 

महावितरणने अपघातास दोषी असणाऱ्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करुन, चौकशीच्या अनुषंगाने ५ अधिकारी व २ कर्मचारी यांच्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे आरोपपत्र दाखल करुन व त्यांची चौकशी करुन, दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द महावितरण कंपनीच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे, असे लेखी उत्तरात म्हटले आहे.
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at सोमवार, जुलै २४, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *