पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २४ जुलै
खर्डा गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस तब्बल १२ वर्षांनंतर आरोपी अन्वर नुरमोहम्मद शेख यास मुंढवा पुणे येथून अटक करण्यात खर्डा पोलीसांना यश आले आहे. या बाबत सविस्तर असे की, दिनांक 30/06/2011 रोजी रात्री 01/30 ते 02 / 30 वा च्या सुमारास खर्डा गावातील फिर्यादी यांची अल्पवयीन पिडीत मुलगी (तत्कालीन वय १६ वर्ष) हीस आरोपी नामे अन्वर नुरमोहम्मद शेख रा. खर्डा, ता. जामखेड याने फुस लावून लग्नाचे अमिष दाखवून दि. ३०/६/२०११ रोजी पळवून नेले होते बाबत जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर 103/2011 भादवि कलम 363, 366 प्रमाणे १/७/२०११ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाले पासुन गुन्ह्यामधील आरोपी नामे अन्वर नुरमोहम्मद शेख हा फरार झाला होता. सदर १२ वर्षांपासुन फरार आरोपी अन्वर नुरमोहम्मद शेख हा पुणे येथे रहात असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस नाईक संभाजी शेंडे, काॅन्स्टेबल अशोक बड़े, राहुल शिंदे, शशी म्हस्के, बाळु खाडे यांचे पथक तयार करुन त्यांना आरोपीचा मुंडवा पुणे येथे जावून शोध घेणे बाबत तोंडी आदेश दिल्याने वरील पथक पुणे येथे जावुन आरोपी नामे अन्वर नुरमोहम्मद शेख याचा शोध घेतला असता, तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षकराकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, या पोलीस पथकाने केली आहे,
No comments:
Post a Comment