खर्डा प्रतिनिधी/२८ऑगस्ट२०२५
आज दिनांक-28/8/2025 रोजी खर्डा येथे भटके विमुक्त आदिवासी सामुदायाची बैठक पार पडली या बैठकीत बोलताना एडवोकेट अरुण जाधव म्हणाले की येत्या 31 ऑगस्ट दिनानिमित्त आपण सर्व भटकी विमुक्त लोकांनी येऊन एकत्र स्वतंत्र दिन साजरा करणार आहोत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पंतु मा . सुजात दादा आंबेडकर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आपण सर्वजण तीन चुलीचे बांध भाऊ आहेत म्हणून आपल्याला देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं परंतु भटक्या मुक्त सामुदायांना 1952 मध्ये स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंत पाच वर्षे सेटलमेंट मध्येच होती म्हणून 31 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण सणासारखा साजरा करणार आहोत यासाठी तुम्ही सर्वजण सहभागी होणं हे गरजेचे आहे त्यावेळेस ते बोलत होते त्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून खर्डा गावचे माजी उपसरपंच भागवत सुरवसे होते तसेच भटके विमुक्त राजपूत सामुदायातील सुनील साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून होते तसेच भटक्या विमुक्त सामुदायातील खर्डा परिसरातील सर्व कार्यकर्ते उपस्थिती होते विशाल पवार संतोष चव्हाण भीमराव सुरवसे उर्मिला कवडे राणी बोत्रे लताताई सुरोशे लहू पवार अशोक जावळे दिनेश चव्हाण प्रकाश माने दिलीप काळे आबा काळे मच्छिंद्र जाधव इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी बोत्रे यांनी केले तर प्रस्तावना विशाल पवार यांनी केले तर आभार उर्मिला कवडे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा