खर्डा प्रतिनधी/२९ऑगस्ट२०२५
खर्डा पोलीस स्टेशनने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांना महत्त्वाची सूचना दिली आहे. या वर्षी डीजे, डॉल्बी आणि इतर सर्व प्रकारच्या ध्वनीवर्धक यंत्रणांचा वापर पूर्णपणे बंदीस्त करण्यात येणार असून, उत्सव परंपरागत व पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातूनच साजरा करण्याची पोलिसांची हमी आहे. हा निर्णय गावातील शांतता, पर्यावरणपूरक व धार्मिक परंपरेचा सन्मान राखण्यासाठी घेण्यात आला आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, जे मंडळ या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होईल. त्यामुळे खर्डा परिसरात यंदा शिस्तबद्ध, शांत आणि निसर्गपूरक वातावणात गणेशोत्सव साजरा होईल. या उपक्रमामागे "डॉल्बी मुक्त गणेशोत्सव – परंपरेला जपुया, शिस्त पाळूया!" हा घोषवाक्य आहे, ज्याद्वारे सामाजिक संस्कार आणि शांती यांचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
गणेशोत्सव हा संस्कृतीचा आणि ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग असून त्यात पारंपरिक वाद्ये आणि नैसर्गिक ध्वनींचा समावेश असणे गरजेचे आहे असे खर्डा पोलीस स्टेशनचे म्हणणे आहे. यामुळे संपूर्ण परिसरात सणाच्या काळातुन मोकळे आणि शांत वातावरण राहील त्याची विशेष काळजी घेतली जात आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी खर्डा पोलीस स्टेशनकडून आलेल्या या सूचनेमुळे स्थानिक गणेश मंडळांचे सहकार्य अपेक्षित असून, सर्व नागरीकांनी या संकल्पनेला पुढाकार देत उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा