जामखेड प्रतिनधी/२९ऑगस्ट२०२५
कर्जत-जामखेड मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलन, मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर १ व २ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी आमसभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आमसभांमध्ये स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन स्तरावर संपूर्ण नियोजन करण्यात आले होते; मात्र, परिस्थिती लक्षात घेता पुढे ढकलण्याची विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाला करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण आंदोलकांमुळे आणि मतदारसंघात सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांनी या आमसभांचे आयोजन पुढे नेण्याची मागणी केली. कर्जत येथे १ सप्टेंबर २०२५ आणि जामखेड येथे २ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित असलेल्या या आमसभा जनता आणि स्थानिक समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या, म्हणून कोणताही नागरिक या बैठका न पाहत राहू नये, यासाठी नियोजित आमसभा सप्टेंबर महिन्यातच परंतु अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
महसूल सहायक व त्यांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आलेल्या निवेदनात सद्यस्थिती आणि सण, आंदोलन याकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. आगामी तारीख आणि पुढील नियोजनासाठी अधिक चर्चा करण्यात येणार असल्याचे आमदार रोहित पवार यांच्याकडून अधोरेखित करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा