खर्डा प्रतिनधी/२९ ऑगस्ट२०२५
जामखेड तालुक्यातील नान्नज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर गावातील १४ जनाच्या टोळक्याने दिनांक २४ ऑगस्ट च्या रात्री हल्ला केला होता. यामध्ये साळवे कुटुंबातील त्यांचे बंधू कै. संपत साळवे यांचा मुलगा अभिजित संपत साळवे यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आदर्श सुनील साळवे व घरातील महिला सदस्य यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला .गाडीच्या काचा फोडून हातात तलवार,कोयता गज,काठी ने सदस्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले व दहशत निर्माण केली. महिला सदस्यांनाही मारहाण झाल्याने या घटनेचे पडसाद शाहू, फुले,साठे व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागले आहेत. या घटनेचा आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी खर्डा पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जामखेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी आरोपीला कडक शासन व्हावे, फरार आरोपीस ताबडतोब अटक करण्यात यावी. संघटीत गुन्हेगारी अंतर्गत मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच शाहू फुले आंबेडकरी विचाराचे तरुण नेतृत्व लाभलेले युवा पत्रकार रिजवान बागवान यांनीही नान्नज येथील घटनेचा निषेध नोंदवला. या निषेधाचे निवेदन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, आरपीआयचे पंचायत समिती गण प्रमुख बबन सदाफुले, आरपीआय घिसाडी आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष कैलास चव्हाण, मुस्लिम विकास परिषदेचे रिजवान बागवान, माजी ग्रामपंचायत सदस्य शहाजी पैठणपगार, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य राजू मोरे, बौद्धाचार्य भीमराव घोडेराव, खर्डा ग्रामपंचायत सदस्य दादा जावळे, सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव,कुणाल मोरे, कमलेश मोरे, रोहित डाडर, आदर्श पैठणपगार, सुमित दाखले, वीर खवळे, यश डाडर, धनसिंग साळुंखे, सचिन पैठणपगार, आदी बहुसंख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा