खर्डा प्रतिनधी/27 ऑगस्ट2025
पत्रकार आशुतोष गायकवाड यांच्या A1 मोबाईल शॉपचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत खर्ड्यात पार पडले. आज दि.27 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध संघटनांच्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
जामखेड तालुक्यातील पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांचे बंधू व पत्रकार म्हणूनही परिचित आशुतोष गायकवाड यांनी A1 मोबाईल शॉप सुरू केली आहे. यंदाच्या 27 ऑगस्टला या नव्या मोबाईल शॉपचे खर्ड्यात आमदार रोहित पवार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी आमदार रोहित पवार यांचा सत्कार संपादिका श्वेता गायकवाड व आशुतोष गायकवाड यांच्याकडून करण्यात आला.
या कार्यक्रमात आमदार रोहित पवार, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक जावळे, अभिमान गीते, रामहरी गोपळघरे, पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड, A1 मोबाईल शॉपचे संचालक आशुतोष गायकवाड, पत्रकार संतोष थोरात, धन्ससिंग साळुंखे, रिजवान बागवान सहित अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी आशुतोष गायकवाड यांना आगामी कामासाठी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा