पनवेल प्रतिनधी/३०ऑगस्ट२०२५
कर्जत-जामखेड मतदारसंघातील मनोज जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव पनवेल परिसरात एकत्र आले आहेत. 2025 ऑगस्ट मध्ये या आंदोलनासाठी पनवेल आणि कळंबोली येथील निवास, नाष्टा, भोजन तसेच वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. ही सोय खास आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळ, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सतीश पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठा आंदोलनाला कोणताही अडथळा येऊ नये या उद्देशाने करण्यात आलेल्या या व्यवस्थेबाबत आयोजकांनी सांगितले की, मराठा बांधवांना आंदोलन काळात जास्तीत जास्त सोय व्हावी यात सर्वांचे सहकार्य आहे. यासाठी विशेषकरून कळंबोली व पनवेल परिसरात अत्याधुनिक सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. याबद्दल जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, मैत्री ग्रुपचे अध्यक्ष सागर गवसने, तसेच कर्जत-जामखेड मतदारसंघातील आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळांनी नगरसेवक सतीश पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा