नेवासा प्रतिनधी/30ऑगस्ट2025
नेवासा पोलीस स्टेशनअंतर्गत माळिचिंचोरा बीटमध्ये दुमाला गावाच्या फाट्याजवळ नेवासा गावाचे शिवारातील अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या हायवेवर २० ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे सुमारे ५:३० ते ६:०० च्या दरम्यान गंभीर रस्त्याचा अपघात झाला. या अपघातात अंदाजे ६५ वर्षे वयाच्या एक अनोळखी पुरुषाची डोक्याला जबर गंभीर जखम झाली आणि त्याच्यावर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशनने अकस्मात मृत्यूची नोंद भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत केली असून सध्या तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि पो.हे.काँ. एस. एन. माने यांनी स्थानिक जनतेचा या प्रकरणी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अपघाताच्या कारणांवर तपास सुरू असून अधिक माहिती पुढील तपासानंतर उपलब्ध होईल. या प्रकारामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी प्रशासन सजग बनले आहे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्यावर भर दिला जात आहे. सदर घटनेमुळे नेवासा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा