पोलीस वारंट न्यूज नेटवर्क २४ ऑगस्ट
खर्ड्याच्या सरपंच संजीवनी पाटील यांचे पती व जामखेड बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील यांना जामखेड येथे दिनांक २४ ऑगस्ट रोजी खर्डा येथील काही व्यक्तींना हाताशी धरून गावगुंडा कडून मारहाण करण्यात आली आहे, असे निवेदनात म्हंटले आहे. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असताना खर्डा शहर भाजपच्या वतीने दिनांक २५ ऑगस्ट शुक्रवार रोजी खर्डा गाव बंद करण्याचे निवेदन निवासी नायब तहसीलदार जामखेड यांना देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशीद, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, सरपंच बापूराव ढवळे, कल्याण सुरवसे, टील्लू पंजाबी, नितीन सुरवसे, गोरख घनवट, संजय पाटील इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
तर झालेले भांडण हे दोन व्यक्ती मधील व पूर्व वैमान्यास्यातून झाले असल्याने खर्डा गाव बंद ठेवू नये याबाबतचे निवेदन शिवपट्टण युवा मंच व ग्रामस्थांच्या वतीने खर्डा पोलीस स्टेशन व निवासी नायब तहसीलदार जामखेड यांना देण्यात आले आहे. यावेळी जामखेड येथे शिवपट्टण युवा मंचचे अध्यक्ष बबलू सुरवसे, संभाजी गोलेकर, बाबू गटकळ, ओंकार इंगळे, तेजस चावणे इ. उपस्थित होते.
यासंदर्भात खर्डा गावातील छोटे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, कापड व किराणा व्यापारी दुकाने बंद ठेवावीत का उघडे ठेवावी अशा संभ्रम अवस्थेत असून याबाबत उद्या खर्डा गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ? यासंदर्भात खर्डा पोलीस स्टेशन व प्रशासन कोणती भूमिका घेतात याकडे खर्डेकरांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment