पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२४ ऑगस्ट
मागील अडिच वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या गुन्ह्यातील दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले होते. यासाठी फिर्यादी या गुन्ह्यातील साक्ष देण्यासाठी आले असता यातील आरोपींनी फिर्यादीजवळ येऊन तु आमच्या विरोधात साक्ष देतो काय असे म्हणत. फिर्यादी खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच पती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील यांना जामखेड न्यायालयाच्या आवारातच लोखंडी टामीने मारहाण करून जखमी केले. जामखेड न्यायालयाच्या आवारातच मारहाणीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी आरोपी बबन नरहरी मदने व निवास उर्फ (भाऊ) बबन मदने या दोन बाप लेकांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, यातील फिर्यादी खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच पती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पोपटराव पाटील व आरोपी बबन नरहरी मदने हे दोघे एकाच गावातील असून या दोघांचे सन २०२० मध्ये भांडण झाले होते. त्यावेळी फिर्यादी वैजीनाथ पाटील यांना मारहाण केली होती. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला आरोपी बबन नरहरी मदने व त्याचे दोन मुले यांच्या विरोधात आडीच वर्षांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. याबाबत गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन गुन्ह्याचे दोषारोप पत्र जामखेड न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी खर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच पती व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील हे आज २४ आँगस्ट रोजी सकाळी साक्ष असल्यामुळे जामखेड न्यायालयात हजर झाले होते. यावेळी फिर्यादी वैजीनाथ पाटील हे त्यांचा मित्र कृष्णा सोपान भुते याच्या सोबत बोलत होते. यावेळी आरोपी बबन नरहरी मदने व त्याचा मुलगा श्रनिवास उर्फ भाऊ बबन मदने दोघे रा. खर्डा ता. जामखेड हे त्या ठिकाणी आले व फिर्यादीस म्हणाले की, तु कोर्टात आमच्या विरोधात साक्ष देतो काय? असे म्हणत दोघांनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण करत बबन नरहरी मदने याने हातातील लोखंडी टामीने कपाळावर मारहाण करत जखमी केले व सोबत असणार्या श्रीनिवास बबन मदने याने गळा दाबून जीवे ठार मारण्यात प्रयत्न केला. व तु आमच्या विरोधात न्यायालयात साक्ष दिली तर बघून घेऊ असे म्हणाले.
यावेळी फिर्यादीच्या ओळखीचे असणारे श्रीराम जायभाय, भास्कर जायभाय, कृषा सोपान भुते, नितीन सुरवसे व मनोज पाटील यांनी सदरचे भांडण सोडवले. मात्र ही सर्व घटना न्यायालयाच्या आवारातच घडल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.
चौकट
न्यायालय परिसरात घटना घडल्याने जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश यांनी घटनेची निंदा करत न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्याचे सक्त आदेश दिले आहेत. तसेच अलिकडील काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी नितीमुल्ये पुर्णपणे धुळीस मिळवली असून गुन्हे करताना आपण कुठे आहोत याचे भान ठेवले पाहिजे. आज न्यायालय घडलेला प्रकार पुर्ण निंदनीय असून अशा गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाणार नाही.
श्री. महेश पाटील
पोलीस निरीक्षक जामखेड पोलीस स्टेशन
No comments:
Post a Comment