पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २४ आॅगस्ट
जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांची नेवासा पोलीस स्टेशनला बदली झाली असून त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून संगीता गिरी या आल्या असून या दोन्ही अधिकाऱ्यांचा जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानदेव भागवत यांचीही श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
काल दि-२३ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते या तिघांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. जामखेड पोलीस स्टेशन येथे झालेल्या या सत्कार समारंभासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी, सुनील बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस कर्मचारी संजय लाटे, ज्ञानदेव भागवत, प्रकाश जाधव, प्रवीण पालवे, सचिन पिरगळ, अविनाश ढेरे सचिन देवढे, भगीरथ देशमाने आदिंसह पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांची नेवासा पोलीस स्टेशनला बदली तर त्यांच्या जागी सह्ययक पोलीस निरीक्षक म्हणून संगीता गिरी ह्या म्हणून रुजू झाल्या आहेत. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानदेव भागवत यांचीही बदली श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे झाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संगिता गिरी यांच्या रूपाने जामखेड पोलीस स्टेशनला महिला अधिकारी मिळाल्याने आता महिलांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी त्यांना मांडता येणार आहेत तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनाही महिलांना न्याय देताना तसेच महिला गुन्हेगारांवर कारवाई करताना सपोनि संगीता गिरी यांची चांगली मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment