पोलीस वारंट न्यूज नेटवर्क- २९ऑक्टोबर
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकल मराठा समाज शिवपट्टण खर्ड्याच्या वतीने खर्डा बसस्थानकावर साखळी उपोषण करण्यात आले आहे . सकल मराठा समाज आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदार जामखेड , खर्डा पोलीस स्टेशन , ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत खर्डा यांना देऊन साखळी उपोषण आज सुरू केले आहे .
या साखळी उपोषणाला खर्डा येथील सर्वपक्षीय नेत्यांनी व शिवपट्टण विकास युवा मांचातील सर्व अठरापगड समाज बांधवांनी साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे .
यावेळी खर्ड्यातील तरूणांनी मोठ्या घोषणाबाजी केल्या " नेत्यांनो, आरक्षण द्या, तरच गावात या! , एक मराठा लाख मराठा , आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशा मोठ्याने घोषणाबाजी तरुणांच्या वतीने मराठा आरक्षणाकरिता करण्यात आल्या आहेत .यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण असेच चालू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच शिवपट्टन विकास युवा मंचाच्या वतीने सामजिक कार्यकर्ते गणेश ढगे व बबलू निकम यांनी आपले मत मांडले यावेळी ते म्हणाले सरकारने आमच्या भावनांना कुठं तरी आवर घाला ,जर तुम्ही आमच्या भावनांना आवर नाही घातला तर आम्ही अजून तीव्र पध्दतीने आंदोलन करू .आम्हा मराठयांना आरक्षण नाहीच मिळाले तर याचा कुठे तरी उद्रेक होऊन सरकारला याचे गांभीर्या घ्यावे लागेल.आमच्या भविष्याच्या पिढीसाठी शैक्षणिक आरक्षण आम्हाला मिळावे , व भविष्यात आम्हाला आरक्षणचा कुठेतरी फायदा होईल. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी आंदोलन अशाच प्रकारे चालू राहील असे त्यांनी शिवपट्टण युवा विकास मंचच्या वतीने सांगितले आहे.
तसेच इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी ज्ञानेशवरी गणेश कवडे हि चिमुकली या साखळी उपोषणास सहभागी होऊन मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा समाजाकरिता मराठा आरक्षणाकरिता तिच्या तीव्र भावना तिनं यावेळी व्यक्त केल्या
चौकट
तसेच काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे या मागणीसाठी खर्डा शहरातील तरुण संतोष साबळे या तरुणाने एका मोबाईल कंपनीच्या टॉवरवर चढून बुधवारी दुपारी शोले स्टाईल आंदोलन केले होते .त्यानंतर तात्पुरते माघार घेतली होती .याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या स्मरणार्थ आज खर्डा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बसस्थानकावर साखळी उपोषणाला प्रारंभ झाला आहे . तसेच खर्डा शहरासह परिसरातील अनेक गावे या साखळी उपोषणास सहभागी होणार असून अनेक गावात आमदार, खासदार, मंत्री, पुढारी यांना गाव गावात प्रवेश बंदीचा इशाऱ्याचे डिजिटल बोर्ड झळकताना दिसून आले आहेत.
No comments:
Post a Comment