पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज साखळी उपोषणास ग्रामस्थांकडून सुरवात झाली आहे.
याबाबत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या आमरण उपोषण करत आहेत .त्यांच्या समर्थनात जातेगाव येथील सकल मराठा समाज जातेगाव च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे शनिवार २७/१०/२३ पासून सकल मराठा समाज आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदार जामखेड, पोलीस स्टेशन खर्डा, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत जातेगाव यांना देऊन साखळी उपोषण सुरू केले आहे.
तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे या मागणीसाठी खर्डा शहरातील संतोष साबळे युवकांनी एका मोबाईल कंपनीचे २००फूट टॉवर चढून बुधवारी दुपारी शोले स्टाईल आंदोलन केले होते.ग्रामस्थांनी आव्हान केल्यावर संतोष साबळे हा युवक टॉवर वरून खाली उतरून आपले आंदोलन तात्पुरती माघारी घेतली होती. याच धर्तीवर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा समाजास आरक्षण सरसकट कुणबी आरक्षण मिळण्यासाठी सुरू केलेले आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी खर्डा शहरातील सकल मराठा समाजाने रविवार २९/१०/२३ पासून साखळी उपोषण सुरू करण्याचे निवेदन खर्डा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक, तहसीलदार जामखेड व कामगार तलाठी खर्डा यांना साखळी उपोषणाचे निवेदन दिले. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणासाठी खर्डा शहरासह परिसरातील गावे या साखळी उपोषणास सहभागी होणार असून अनेक गावात आमदार, खासदार ,मंत्री, पुढारी यांना गाव गावात प्रवेश बंदीचा इशाऱ्याचे डिजिटल झळकताना दिसून येतात. मराठा आरक्षणाचे लोन खर्डा शहरासह ग्रामीण भागात खेडोपाडी पोहीचल्याचे दिसून येते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा