पोलीस वारंट न्यूज नेटवर्क २८ऑक्टोबर
युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी युवा आमदार रोहित पवार यांनी राज्यात सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. रोहित पवार यांनीच त्याबाबतचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही त्यांनी केली.
राज्यातील युवकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी युवा संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या यात्रेला मंगळवारी (२४ ऑक्टोबर) प्रारंभ झाला होता. ही यात्रा शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पोहोचली असताना रोहित पवार यांनी यात्रा स्थगितीचा निर्णय जाहीर केला.
No comments:
Post a Comment