पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुक्रवार पेठ , येथील शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले होते , त्याचा मुलांना खेळण्यासाठी अडथळा येत होता .
गेली आठ दिवसापासून गवत काढण्यासाठी शोधूनही कोणीही मजूर मिळत नव्हता . शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. कामिनी राजगुरु यांनी स्वतः ग्रामपंचायत कार्यालय खर्डा कडून तणनाशक फवारणी पंप मिळवून स्वतः वाढलेल्या गवतावर फवारणी केली. मुलांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या कामाचे सर्व स्तरांतून त्यांचे कौतूक होत आहे
शुक्रवार पेठ शाळेतील विद्यार्थी यांची शैक्षणिक गुणवत्ताही चांगली असून येथे काम करणाऱ्या दोनही शिक्षिकांचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल जाधव, केंद्रप्रमुख राम निकम व तालुक्यातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे .
No comments:
Post a Comment