खर्डा प्रतिनिधी : १४ आॅक्टोबर
खर्डा व परिसरात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे शहरालगत व नागोबाचीवाडी व मुंगेवाडी कडे जाणाऱ्या नदीला पूर आला असून या रस्त्यावरून जाणाऱी वाहन व नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
अनेक वर्षांनंतर या नदीला पूर आला आहे. ही नदी बेलेश्वर मंदिर रोडवर असून नागोबाचीवाडी व मुंगेवाडी व पखरूड कडे जाणारी व येणारी वाहने व नागरिकांची मोठी अडचण झाली आहे.तसेच काही वेळा पुर्वी १ तेरा वर्षांचा मुलगा वाहुन जाताना तेथे असलेल्या नागरिकांनी त्याला वाचवला असल्याचीही माहीती मिळत आहे.
तरी अशा परिस्थितीत पाण्यातून ये जा करताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment