खर्डा प्रतिनिधी : १४ आॅक्टोबर
खर्डा येथे पावसाची संततधार सुरूच असून सातत्याने पडणाऱ्या पावसाचे पाणी बसस्थानकाच्या इमारतीत शिरत आहे. तसेच परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने खर्डा येथील नागरिक, प्रवाशी व विद्यार्थांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खर्डा हे ऐतिहासिक व धार्मिक असे परिसरातील मोठे केंद्र बनु पाहात आहे. तसेच या परिसरातील व्यापाराचे मोठे केंद्र म्हणून खर्डा शहर परिचीत आहे. त्या अनुषंगाने येथे प्रवासी मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच परिसरातील ग्रामीण भागातून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र असे असतानाही स्थानिक एस. टी. प्रशासन लक्ष देताना दिसत नाही. परिणामी प्रवास्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान आज सुरू असलेल्या पावसामुळे
खर्डा येथील बसस्थानकामध्ये थेट पाणी शिरले तर परिसराला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
पाऊस पडल्यावर पावसाचे पाणी थेट बसस्थानक येणे ही नित्याचीच समस्या झाली आहे. ही बसस्थानकाची इमारत नवीन असून इमारतीचा आराखडा चुकला असल्याची चर्चा आहे. परिणामी खर्डा व पंचक्रोशीतील विद्यार्थी व प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय. संबंधितांनी लक्ष देऊन यातून सुटका करावी अशी मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा